शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

अॅण्ड्रॉइडवरच्या छुप्या युक्त्या





1. अॅण्ड्रॉइडवरीलस्मार्ट लॉक
आपला फोन कुणाच्याही हातात पडला तरी त्याला तो पाहता येऊ नये, यासाठी स्मार्टफोनवरलॉकची सुविधा देण्यात आली आहे. मात्र या सुविधेचा आपल्याला अनेकदा त्रासही होतो. विशेषत: घाईगडबडीच्या वेळी आपल्याला फोनचापॅटर्न लॉककाढण्यासाठी खर्च होणारा वेळही युगासमान वाटतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या मोबाइलमध्येस्मार्ट लॉकची सुविधा कार्यान्वित करू शकता.
ही सुविधा सुरू करण्यासाठी स्मार्टफोनच्यासेटिंगमध्ये जाऊनसिक्युरिटीवर क्लिक करा. तेथेस्मार्ट लॉकची सुविधा दिसेल. त्यामध्ये तुम्हाला विविध पर्याय दिसतील. यात तुमचा फोन कुठे लॉक असला पाहिजे, कुठे तुम्ही केवळस्वाइपने फोन अनलॉक करू शकता, अशा पर्यायांचा समावेश आहे.

2. सायलंटफोनची शोधाशोध
आपला फोन आपण कुठे तरी ठेवून विसरतो आणि मग कुणाला तरीरिंग द्यायलाविनवणी करावी लागते. रिंग वाजल्यामुळे फोन सापडतो. पण अशा प्रसंगी फोनसायलेंट मोडमध्ये असेल तर..? फोनसायलेंटअसेल तर कितीही कॉल करून तुम्हाला त्याचा शोध लागणार नाही. अशा वेळी ही युक्ती वापरून बघा.
तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपच्या इंटरनेट ब्राऊजरवर जाऊन http:android.com/devicemanager ही लिंक खुली करा. त्यावरील लॉग इन स्क्रीनमध्ये तुमच्या फोनवरीलजी मेलआयडी आणि पासवर्ड टाका. त्यानंतर दिसणाऱ्या पेजच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन लगेच शोधू शकता. अगदी फोन सायलेंट असेल तरी या सुविधेच्या माध्यमातून तो मोठमोठय़ाने रिंग होतो.

3. डेव्हलपरव्हा!
तुमच्या अॅण्ड्रॉइड फोनवरील अंतर्गत किंवा पडद्यामागील घडामोडींवर बऱ्यापैकी नियंत्रण आणायचं असेल तर तुम्हाला तुमच्या फोनचाडेव्हलपरझालं पाहिजे. यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज नाही. तुमच्या मोबाइलच्या सेटिंगमध्ये जाऊनअबाऊट फोनवर क्लिक करा. त्या स्क्रीनवर तुमच्या मोबाइलचाबिल्ड नंबरअर्थात आवृत्ती दिसेल. त्या पर्यायावर पाच ते सात वेळा क्लिक करा. तुम्हालायू आर डेव्हलपरअसा संदेश पाहायला मिळेल. याचा अर्थ आता तुम्ही तुमच्या मोबाइलच्या अंतर्गत यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही नियंत्रण आणू शकता.
डेव्हलपर होण्याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या फोनचा स्पीड वाढवू शकता. बऱ्याचदा दोन अॅप्समध्ये जाताना किंवास्क्रीनपुढे सरकवताना आपला फोन काहीसा मंदावल्यासारखा वाटतो. अशा वेळी सेटिंगमध्ये जाऊनडेव्हलपर्स ऑप्शनहा पर्याय निवडा. त्यामध्येअॅनिमेशन स्केलचा पर्याय दिसेल. ‘अॅनिमेशन स्केलकमी केल्यावर तुम्हाला तुमच्या फोनच्या वेगात सुधारणा झाल्याचे दिसेल.

4. आयफोनवर मोबाइल डेटाची बचत
मोबाइलवरील इंटरनेट डाटा दिवसेंदिवस महाग होत चालल्याने आपण त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक करत असतो. मात्र अनेक अॅप्स असे असतात, जे त्यांचा वापर करतादेखील इंटरनेट डाटा वापरत असतात. त्यामुळे आपला डाटा आणि पैसा खर्च होतो. अशा अॅप्सवर नियंत्रण आणण्याची सुविधाआयओएसवर आधारित फोनमध्ये अर्थात आयफोनमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी फोनच्यासेटिंगमध्ये जाऊनऑथराइज टू यूज डाटाहा पर्याय रद्द करा (अनसिलेक्ट करा).
कोणत्या अॅप्सना इंटरनेट वापरण्याची परवानगी द्यायची, हेदेखील तुम्ही ठरवू शकता. त्यासाठी सेटिंगमध्ये सुविधा उपलब्ध असून त्यात तुम्ही डेटाखाऊ अॅप्सना केवळवायफायमध्ये चालण्याची मर्यादा घालू शकता.