शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

पाठविलेल्या मेलचा रिपोर्ट पाहणे



तुम्ही पाठवलेला मेल वाचला गेला की नाही याची पोचपावती कशी मिळवाल?
 तुम्ही पाठवलेला मेल वाचला गेला की नाही याची पोचपावती कशी मिळवाल? याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.असे केल्याने तुम्ही पाठवलेला मेल त्या व्यक्तीने वाचला की नाही,अथवा बघताच डिलीट केला..वाचला तर किती वाजता वाचला ? त्याचा ब्राउजर कोणता होता ? ऑपरेटिंग सिस्टीम कोणती होती ? याची माहिती ही तुम्हाला यामुळे कळेल.
हे कसे कराल?
प्रथम खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नाव नोंदणी करा.

नाव नोंदणी करा.

)तुमच्या खात्याची पडताळणी करण्यासाठी एक पडताळणी मेल तुमच्या इमेल खात्यावर पाठवला जाईल तो उघडा आणि तुमच्या खात्याची पडताळणी करा. त्यासाठी इमेल मधील दुव्यावर टिचकी द्या अथवा activation code  नवीन उघडलेल्या पानावर लिहा.
अश्याने तुमच्या खात्याची पडताळणी पूर्ण होईल.
) ज्या व्यक्तीला मेल करायाचा आहे त्यांच्या इमेल पत्त्याच्या नंतर  .getnotify.com  चा समावेश करा.उदा.
xyz@gmail.com.getnotify.com  हे फक्त तुम्हाला दिसेल.समोरच्या व्यक्तीला .getnotify.com चा समावेश त्याच्या इमेल मध्ये केला आहे हे दिसणार नाही.
) समोरच्या व्यक्तीने तो मेल उघडून वाचला तर तुमच्या इमेलेच्या इनबॉक्समध्ये त्या संबंधी माहिती देणार मेल येईल.
त्यात तो मेल कधी उघडला तो दिवस,ती वेळ,ब्राउजर,ऑपरेटिंग सिस्टीम इत्यादीची माहिती असेल.
ही सेवा मोफत असल्यामुळे,एका दिवसात फक्त  पाच इमेलची माहिती  तुम्ही ट्रक करू शकता.
धन्यवाद

संकलन :आसिफ मौला शेख