शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

स्‍वावलंबन


एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्याच शहरात चालले होते. त्यांच्यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्वाराच्या हातून चाबूक खाली पडला. त्या व्यक्तिने त्या घोडेस्वारास खाली उतरू देता, चाबूक देण्याची तयारी दर्शविली पण त्या सहका-यास नम्रपणे नकार देत स्वत: खाली उतरून त्या घोडेस्वाराने चाबूक स्वत: हातात घेतला.

खालून मदत करणा-या व्यक्तिने याचे कारण घोडेस्वारास विचारले असता घोडेस्वार उत्तरला,''आपण ज्यावेळी घोड्यावर बसतो तेव्हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण राहिलो तरच आपल्याला यशाची खात्री आहे असे समजावे.''

तात्पर्य :- कुणावरही विसंबून राहता स्वावलंबनाचा स्वीकार केल्याने यश मिळतेच.