शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

पहिलीच्या विद्यार्थ्यांना अक्षरलेखन शिकवताना


♣इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याना मुळाक्षरांचे लेखन शिकवण्यासाठी खालील पद्धत वापरल्यास नक्की फायदा होईल.

♣सारख्या दिसणाऱ्या अक्षरांचा गट करुन सराव घेतल्यास विद्यार्थी लवकर व सहज लेखन करतील.

♣प्रथम उभ्या रेषा ,आडव्या रेषा,तिरप्या रेषा,अर्ध गोल ,पूर्ण गोल यांचा भरपूर सराव घ्यावा.
(---|||<<>>\\\^^==×+~~~)

♣सारख्या दिसणाऱ्या मुळाक्षरांचा गट खालील प्रकारे करता येईल.....

🏵अ आ उ ऊ ओ औ अं अः
🏵व ब क ळ
🏵प ष फ ण
🏵र ख स य श थ
🏵ट ठ ड ढ द क्ष इ ई झ
🏵घ ध छ च ज
🏵ग म भ न त
🏵त्र ऋ श्र
🏵ए ऐ

(अशा प्रकारे सारख्या दिसणाऱ्या अक्षरांच्या गट करून अक्षर लेखन सराव घेतल्यास विद्यार्थी सहज लेखन करतील.)