शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

अ आ आई

अ आ आई, 
म म मका 
मी तुझा मामा 
दे मला मुका

प प पतंग 
आभाळात उडे 
ढ ढ ढगांत 
चांदोमामा दडे 
घ घ घड्याळ, 
थ थ थवा 
बाळ जरी खट्याळ, 
तरी मला हवा

ह ह हम्मा 
गोड दूध देते 
च च चिऊ 
अंगणात येते 
भ भ भटजी, 
स स ससा 
मांडीवर बसा 
नि खुदकन हसा

क क कमळ 
पाण्यावर डुले 
ब ब बदक 
तुरुतुरु चाले 
ग ग गाडी 
झुक झुक जाई 
बाळ माझे कसे 
गोड गाणे गाई

- मधुसूदन कालेलकर