शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

चला २ अंकी संख्या तयार करूया.

चला २ अंकी संख्या तयार करूया.
इयत्ता – २ री
🌷🌷🌷🌷🌷🌷
साहित्य :
१ ते ९ अंकापैकी कोणतेही ४ संख्या कार्ड.
🌸🌸🌸🌸🌸🌸
कृती:-
👉🏾 प्रथम ४ विद्यार्थ्यांकडे ४ कार्ड देऊन त्यांना चौकोनात उभे करणे.

👉🏾 एका मुलाकडे खडू देऊन संख्यालेखन फलकावर संख्या लेखन करायला सांगणे.

👉🏾 समजा आपण २,,,६ हे अंककार्ड विद्यार्थ्यांना दिले.

👉🏾 २ अंक ३ च्या जवळ जाईल. त्या अंकापासून तयार होणारी संख्या विद्यार्थी फळ्यावर लेखन करेल२३.

👉🏾 त्यांची अदलाबदल करून दुसरी संख्या ३२ तयार होईल.

👉🏾 संख्या लेखन केल्यावर ती संख्या अक्षरात व दशक एकक रूपातही विद्यार्थी कडून लेखन करून घेणे.

 👉🏾 ३ अंक ४ च्या जवळ जाईल. त्या अंकापासून तयार होणारी संख्या विद्यार्थी फळ्यावर लेखन करेल ३४.
👉🏾 त्यांची अदलाबदल करून दुसरी संख्या ४३ तयार होईल.
 👉🏾 ४ अंक ६ च्या जवळ जाईल. त्या अंकापासून तयार होणारी संख्या विद्यार्थी फळ्यावर लेखन करेल ४६.
👉🏾 त्यांची अदलाबदल करून दुसरी संख्या ६४ तयार होईल.

👉🏾 ६ अंक २ च्या जवळ जाईल. त्या अंकापासून तयार होणारी संख्या विद्यार्थी फळ्यावर लेखन करेल६२.
👉🏾 त्यांची अदलाबदल करून दुसरी संख्या २६ तयार होईल.

या प्रमाणे ८ संख्या तयार झाल्यावर.

 👉🏾 विद्यार्थी आपल्या समोर उभ्या असलेल्या मित्राजवळ जाईल.
👉🏾 उदा. २ अंक ४ च्या जवळ जाईल. त्या अंकापासून तयार होणारी संख्या विद्यार्थी फळ्यावर लेखन करेल २४.
👉🏾 त्यांची अदलाबदल करून दुसरी संख्या ४२ तयार होईल.
 👉🏾 ३अंक ६ च्या जवळ जाईल . त्या अंकापासून तयार होणारी संख्या विद्यार्थी फळ्यावर लेखन करेल ३६.
 👉🏾 त्यांची अदलाबदल करून दुसरी संख्या ६३ तयार होईल.

👉🏾 याप्रमाणे विद्यार्थी ४ अंकापासून विद्यार्थी १२ संख्या सहज तयार करतील.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
फलनिष्पत्ती-
🌈  १]विद्यार्थी जलद गतीने संख्या तयार करतात.

🌈 २]संख्या अंकात व अक्षरात लेखनाचा सराव जलद गतीने होतो.

🌈 ३]अचूक संख्या वाचन लेखनाची सवय लागते.

🌈 ४] संख्या दशक एकक स्वरुपात सहज सांगता येतात.

श्री. प्रकाश चव्हाण
बोरस्तेवस्ती