शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

इयत्ता पहिली नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी

 हस्त व नेत्र कौशल्य विकसनासाठी

१)टायर फिरवणे (निर्णयक्षमता विकास)
२)गादीवर कोलांट्या उड्या
३)झोका खेळणे
४)एका पायावर तोलणे
५)शांत संगीतावर हलचाल
६)तीन बोटांचा वापर करून कागद फाडणे
७)सरळ रेषेत कागद फाडणे
८)घडी घालून कागद फाडणे

निर्णयक्षमता विकसनासाठी
९)ठसेकाम
१॰)बाटल्या,बरण्यांची झाकणे काढणे लावणे
११)बाटलीत बरणीत माती भरणे
१२)कडधान्ये निवडायला देणे
(एकाग्रता ,बोटांना वळण लावण्यासाठी)

समजपूर्वक ऐकण्यासाठी
१३)गाणी गोष्टी ऐकवणे
१४)टी व्ही वरील संवाद ऐकवणे
१५)एका वाक्याची सूचना देणे
१६)छोटी शब्दकोडी सोडवायला देणे
१७)मातीकाम
१८)धावदोरा घालणे (स्नायुंची मजबुती )
१९)दोर्‍यांची रंगीत डिझाईन बनवणे
२॰)खडूने चित्र काढुन रांगोळी सोडणे
२१)मुठीने हात न उचलता षटकोन काढणे
२२)वेणी घालणे
२३)आकार काढुन बिया,खडे लावणे
२४)वाचनपूर्व तयारी श्रवण
गोष्टींच्या पुस्तकावर गप्पा मारण
२५)एक काम१५ मिनिटांसाठी  देवून बैठक वाढवण्यास मदत
   वरील सर्व सुरवातीचे उपक्रम पहिलीच्या वर्गात घेवून मुलांची मेंदुला निर्णयक्षमता विकसनास मदत होते

स्नायु विकसीत होतील असे खेळ
गोलाकार उभे राहून मुक्त हालचाली
उलटे चालणे
कांदा फ़ोड
डोक्यावर वस्तू  ठवून चालणे
पाण्याने भरलेला ग्लास घेऊन चालणे
फिरत्या टायर बरोबर फिरणे
उंच उडी .
लांब उडी .
दोर उडी .
गादीवर कोलांटी उडी .
दोरीवर चढणे .
घसरगुंडीवर चढणे उतरणे
एका पायावर उभे राहणे
एका हाताने चेंडू फेकणे
दोन्ही हातानी चेंडू झेलणे .
झोक्यावर बसून झोके घेणे
घडी काम
मातीकाम
लोकरीचा धावदारा घालणे
लेखन पूर्वतयारी 
तीन बोटांचा वापर करून कागद बारीक फाडता येणे
सरळ रेषेत कागद फाडणे
खळ लावून चित्र  चिटकविणे.
 खडूने चित्र रंगविणे
भेंडी , बटाटा ' दोरा  ठशांतून चित्र काढणे .
बाटल्यांची टोपणे लावणे काढणे
तालावर सावकाश व भरभर हालचाल करणे
 बाटलीत माती भरणे ओतणे
कडधान्ये निवडणे
शेंगा सोलून दाणे काढणे .
पाणी गाळणे
गाणी _ बडबड गीते .
 विनोदी आशयाची गाणी ऐकवावीन . शक्यतो संगिता सह गाणी ऐकू या
 गोष्ट _ १० मिनीटाच्या भावविश्वाशी निगडीत गोष्ट ऐकविणे . मजेशीर गमतीदार गोष्टी .
नाटयीकरण ऐकविणे
 माहीती ऐकविणे -वर्तमानपत्र गावातील कार्यक्रम इ घटनावर चर्चा घ्यावी .ऐकवावी
श्रवण्
आवाज ऐकणे प्राणि वाहने पक्षी यांचे आवाज ऐकविणे .
आवाज काढायची संधी देणे .
आवाज निर्माण करणारी साधने वापरून आवाज ऐकवणे
उद्देश्य = आवाजातील साम्य भेद ओळखता येणे .
सूचना  -एका वेळी एक सूचना देणे .कृती करतात का बघणे शब्द ऐकणे _हेतू पूर्ण निवडक शब्द ऐकविणे .समान अक्षराने सुरु होणारे व शेवट होणारे शब्द
श्रवण्
आवाज ऐकणे प्राणि वाहने पक्षी यांचे आवाज ऐकविणे .आवाज काढायची संधी देणे .आवाज निर्माण करणारी साधने वापरून आवाज ऐकवणे
 मुले काय करणार _
१-ऐकलेले सोपे शब्द व वाक्य सांगणे
२_नविन शब्द छोटी वाक्ये बिनचूक बोलणे मोठी मुले व्यक्ती शिक्षक यांच्याबरोबर संभाषण करणे
छोटी व_ सोपी शब्दकोडी चित्र कोडी सोडविणे. गाणी म्हणण्यास संधी देणे चित्र व स्कू यांच्याबद्दल बोलता येणे .
गोष्टीतील विनोदी प्रसंग सांगता येणे
मुलांनी सूचना देणे
: गोष्टी क्रमवार सांगता येणे . चित्रक्रमवार लावता
✏पहिला मुद्दा मूल समजून घेणे
✏सगळीच मुलं सारखी नसतात
✏प्रत्येकात काही ना काही वेगळेपण आसतं हे निश्चित
✏कुवत बघून मुलाला आवडी प्रमाणं शिकू देणं
✏पालकांनी आपेक्षा करणं चुकीचं
✏मेन मुद्दा तुलना करूच नये
✏स्वत:हून शिकण्यास प्रोत्साहन देणं
✏शिक्षा म्हणून दूर ठेवणं

वाजवी पेक्षा सुविधा पुरवणं,भौतिक सुविधा देणं म्हणजे मुलं शिकतात हा समज चुकीचा