शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

असे जीवन जगावे..


कुणाला आपला कंटाळा येईल 
इतकं जवळ जाऊ नये
चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये

कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये
आपण मात्र आयुष्य भर
कुणाला झिडकारू नये

आपुलकीचा विणला गोफ
आपण कधीच उसवू नये
नशीबाने जुळलेली नाती जपावी पण तोडू नये

गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघङ वाटू नये
जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये

सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये
नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये

हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुसर्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.......