शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

विशेष संवर्ग भाग 1




विशेष संवर्ग भाग 1 साठी Transfer Portal  सुरु झाले आहे...

विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत खालील 13 घटकांचा समावेश होतो...
1. पक्षाघाताने आजारी शिक्षक ..
2. अपंग शिक्षक,मतिमंद मुलांचे अपंग मुलांचे पालक...
3. ह्रदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक..
4. जन्मापासून एकच किडनी असलेले/मुत्रपिंड रोपण केलेले/डायलिसीस सुरु असलेले शिक्षक...
5. कॅन्सरने आजारी शिक्षक... 
6. आजी/माजी सैनिक अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/विधवा..
7. विधवा कर्मचारी..
8. कुमारिका कर्मचारी..
9. परित्यक्ता/घटस्फोटीत महिला कर्मचारी..
10. वयाची 53 वर्षे पूर्ण केलेले शिक्षक/शिक्षिका...
11. मेंदूचा आजार झालेले शिक्षक..
12. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/मुलगी/नातू/नात(स्वातंत्र्यसैनिक हयात असेपर्यंत..)
13. थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक..

 🍁विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत शिक्षकांना बदली नकोअसेल तर बदलीतून सूट मिळते. अशा नकार देणा-या शिक्षकांच्या जागा कोणालाही मागता येणार नाहीत..या संवर्गातील शिक्षक अगदी सेवानिवृत्तीपर्यंत  त्याच शाळेत राहू शकतात..
🍁विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत शिक्षकांना बदली हवी असेल तर जिल्ह्यातील कोणत्याही बदलीपात्र शिक्षकाची जागा तो मागू शकतो..( सिनीयर असो किंवा ज्युनियर)

Online विवरणपत्र भरण्याची कार्यपद्धती... 
🌷HM login वरुन Transfer Portal login करा..
🌷4 टॅब दिसतील,त्यातील Intra-District Transfer या टॅबला क्लिक करा...
🌷त्यातील 1 ली Transfer Application या टॅबला क्लिक करा..
🌷 Select Designationमध्ये Under graduate/Graduate यापैकी जे असेल ते क्लिक करा..
🌷 Select teacher मधून ज्यांचा form भरायचा त्या शिक्षकाला select करा..
🌷संबंधित शिक्षकाची staff portal ला verifyकेलेली माहिती दिसून येईल..
     ज्यांची माहिती staff portal ला भरलेली नाही किंवा verify केलेली नाही, त्यांची नावे विवरणपत्र भरण्यासाठी दिसणार नाहीत...
🌷 Select Category वर क्लिक करा..
🌷 Select sub-category वर क्लिक करा...
🌷 13 संवर्ग दिसतील..लागू असेल तो निवडा..
🌷 Select subject मध्ये सहशिक्षक असेल तर All subject असं दिसेल..पदवीधर/विषयशिक्षक असेल तर शिक्षकाचा विषय निवडा..
🌷त्यानंतर "बदलीपात्र यादीत माझं नाव असलं तरी मी विशेष संवर्ग भाग 1 मध्ये असल्यामुळे मला बदलीतून सूट हवी.."असं वाक्य आहे..
   बदलीतून सूट हवी असेल तर Yesला क्लिक करा...
    बदली हवी असेल तर No ला क्लिक करा...
🌷 Yes ला क्लिक केल्यास 20 पसंतीक्रम भरण्याची गरज नाही/भरता येणार नाहीत..
🌷 Noला क्लिक केल्यास जास्तीतजास्त 20 पसंतीक्रम भरता येतील...
🌷पसंतीक्रम भरताना  जिल्हा निवडा किंवा आपोआप दिसेल...
🌷त्यानंतर तालुका निवडा..जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी दिसेल...त्यातील हवा तो तालुका निवडा..
🌷 Select villageमध्ये निवडलेल्या तालुक्यातील महसूली गावांची यादी दिसेल..गाव निवडा..
🌷 Select school मध्ये निवडलेल्या महसूली गावातील सर्व जि..शाळांची नावे दिसतील,त्यातील शाळा निवडा...
🌷अशाप्रकारे 20 शाळा निवडून add करत राहा..
🌷भरलेल्या पसंतीक्रमामध्ये Save करण्याच्या आधी बदल करता येतील..
🌷पसंतीक्रम delete करता येईल.. update करता येईल..पसंतीक्रम   खाली-वर करता येईल..
🌷 आवश्यकतसे विवरणपत्र भरल्यानंतर save करा..
🌷अर्ज save केल्यानंतर प्रिंटसाठी कसा दिसतो हे पाहण्यासाठी टॅब क्र.2 Veiw option(draft version)क्लिक करा..हा form मराठीतून दिसेल..
🌷माहिती तपासून ती बरोबर असल्यास टॅब क्र.3 Verification of transfer application करा..
🌷माहिती पुन्हा तपासा..बरोबर असल्यास verify करा..
🌷Verify केल्यानंतर विवरणपत्रात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही...त्यामुळे जे काही बदल करायचे असतील ते verify करण्यापूर्वीच करावेत..
🌷Verify केल्यानंतर टॅब क्र.4 Print transfer application मधून प्रिंट काढावी....

 दक्षता  
Online form हे HM/BEO login वरुन भरता येणार आहेत..
   ज्या शिक्षकाचा form भरायचा आहे त्याच्या सहीने offline form स्थळप्रत म्हणून HM ने भरुन घ्यावा..
विशेष संवर्ग भाग 1 मधील 13 घटकांपैकी आवश्यक घटकाचा खरा पुरावा शिक्षकाकडे उपलब्ध असेल तरच HM login वरुन संबंधित form भरावा..
      Online विवरणपत्राच्या 3 प्रती काढाव्यात..1 प्रत संबंधित शिक्षकाला द्यावी..1 प्रत पुराव्यासह शाळेत स्थळप्रत म्हणून ठेवावी...1 प्रत पुराव्यासह BEO कार्यालयात जमा करावी...
     बदलीच्या कोणत्याही टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी होऊ शकते...

🌷 साधारणपणे गरजेपुरते बदल होऊन अशीच प्रक्रिया यापुढे टप्पा क्र.3,4 5 मध्ये राबविली जाईल......