शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

TRAI तर्फे तीन नवे अॅप लॉंच



ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांविषयी त्यांना सर्वप्रकारची माहिती सहज उपलब्ध व्हावी, या हेतूने दूरसंचार नियामक ट्रायतर्फे तीन अॅप आणि वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. माय कॉल अॅप, ‘माय स्पीड अॅप आणि डू नॉट डिस्टर्ब 2.0’ अशी या अॅपची नावे आहेत. 

 माय कॉल अॅप :
 या अॅपद्वारे मोबाईल फोन यूजर्स आपल्या व्हाईस कॉलच्या गुणवत्तेबाबत त्याच वेळेस आपल्याला आलेला अनुभव ट्रायला सांगता येणार आहे.  या माध्यमातून ग्राहकांना आलेले अनुभव, नेटवर्कची गुणवत्ता याबाबतची आकडेवारी जमा करण्यास ट्रायला मदत मिळणार आहे.

 माय स्पीड अॅप :
 या अॅपच्या मदतीने ग्राहकांना 3G आणि 4G चा स्पीड जाणून घेता येणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या अॅपच्या मदतीने डेटाची वेग तपासणी निशुल्क करता येणार आहे.

 डू नॉट डिस्टर्ब अॅप :
नव्याने सादर करण्यात आलेल्या या अॅपमध्ये स्पॅम डिटेक्शनचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या माध्यमातून जाहिरातींच्या एसएमएसची तपासणी करण्यात येणार आहे.