शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

युपीएससी साठी आवश्यक आभ्यासक्रम


युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (संघ लोकसेवा आयोग). नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक सक्षम उमेदवारांची निवड करणारी स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देशाच्या विविध सेवांमध्ये म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा यांसारख्या सुमारे 36 सेवांची दालने तरुणांसाठी खुली होऊ शकतात. प्रशासनातील सनदी सेवा पदांची निवड करण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी किमान 16 प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन केले जाते. 

UPSC पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रम
         
      दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. तसेच दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या आहेत.  
      सामान्य अध्ययन पेपर 1  - एकूण- 7 घटक, वेळ -2 तास, प्रश्‍न - 100, गुण- 200 
      सामान्य अध्ययन पेपर 2  - एकूण- 7 घटक, वेळ -2 तास, प्रश्‍न-80 , गुण-200 
      निगेटिव्ह मार्किंग UPSC-MPSC दोन्हीसाठी 3:1  आहे. 
         अ) सामान्य अध्ययन पेपर - 1 : पेपर-1 हा 100 प्रश्‍नांचा व 200 गुणांचा असतो. त्यातील घटकनिहाय प्रश्‍न व गुण वितरण पुढीलप्रमाणे असते - 
  1)     चालू घडामोडी - 10 प्रश्‍न 20 गुण 
  2)     इतिहास - 15 प्रश्‍न 30 गुण 
  3)     महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल - 15 प्रश्‍न 30 गुण 
  4)     भारतीय राज्यपद्धती व प्रशासन -15 प्रश्‍न 30 गुण 
  5)     आर्थिक व सामाजिक विकास - 15 प्रश्‍न 30 गुण 
  6)     पर्यावरणासंबंधी सर्वसाधारण मुद्दे - 15 प्रश्‍न 30 गुण 
  7)     सामान्य विज्ञान -15 प्रश्‍न 30 गुण 
     या संख्येत दरवर्षी बदल होतो. 
       ब) सामान्य अध्ययन पेपर-2 : पेपर-2 हा 80 प्रश्‍नांचा व 200 गुणांचा असतो. त्यातील घटकनिहाय प्रश्‍न व गुण वितरण पुढीलप्रमाणे असते - 
  1)     आकलन - 10 उतार्‍यावरील 40 प्रश्‍न (100 गुण)
  2)     संवादकौशल्यासहित आंतरव्यक्तिगत कौशल्य - 0  
  3)     तर्कसंगत विश्‍लेषण व विश्‍लेषण - 8 प्रश्‍न, 20 गुण 
  4)     निर्णयक्षमता व समस्या निराकरण - 8 प्रश्‍न, 20 गुण 
  5)     साधारण बुद्धिमापन चाचणी - 8 प्रश्‍न, 20 गुण 
  6)     अंकज्ञान व माहिती विश्‍लेषण - 8 प्रश्‍न, 20 गुण 
  7)    मराठी व इंग्रजी भाषा आकलन - 8 प्रश्‍न, 20 गुण 

  UPSC  मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम
        
     UPSC  नागरी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप

      या परीक्षेत एकूण 9 पेपर्स 2350 गुणांसाठी आहेत. त्यातील पात्रता पेपर्समधील 600 गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जात नाहीत. पात्रता पेपर्समध्ये उमेदवारास आयोगाने निश्‍चित केलेल्या किमान मानकापेक्षा जास्त गुण मिळविणे आवश्यक असते. सदर मानक हे 25% आहे. 
 अ)    पात्रता पेपर - 
     पेपर ’अ’ - भारतीय भाषा - 300 गुण  
     पेपर ’ब’ - अनिवार्य इंग्रजी - 300 गुण 
   ब)    गुणानुक्रमासाठी ग्राह्य धरले जाणारे  विषय  - 
     अनिवार्य विषय - प्रत्येक पेपरचा कालावधी 3 तास. 
     पेपर 1-निबंध (250 गुण), 2500 शब्द 
     पेपर 2 -भारतीय वारसा, संस्कृती इतिहास व भारत व जगाचा भूगोल (250 गुण), 5000 शब्द 
     पेपर 3-शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध (250 गुण),5000 शब्द 
     पेपर 4- अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान (250 गुण), 5000 शब्द 
     पेपर 5- नैतिकता, निष्ठा व कल/दृष्टिकोन (250 गुण), 3700 शब्द  
     वैकल्पिक विषय - 
     पेपर 6 - वैकल्पिक विषय (पेपर-1) (250 गुण) 
     पेपर 7- वैकल्पिक विषय (पेपर-2) (250 गुण) 
   24)  UPSC मुख्य परीक्षांची तयारी करताना कशावर भर द्यावा? 
      परीक्षातील यशामध्ये अभ्यासाइतकाच नमुना पेपर्स सोडविण्याचा सराव खूपच महत्त्वाचा आहे. गेल्या परीक्षांतील यशाचे गुणमानक लक्षात घेऊन आपले उद्दिष्ट निश्‍चित करून तितके किमान गुण मिळविण्यासाठी सराव करावा. UPSC साठी हे मानक 40 ते 45% चे असते, तर MPSC ने पर्सेंटाईल  पद्धत स्वीकारल्याने ते विविध संवर्गासाठी पुढील प्रकारचे आहे : खुला -35%, आरक्षित-30% ,खेळाडू व अपंग -20%.  
          युपीएससीची मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असल्याने लिखाणाचा सराव महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे 20 शब्द लिहिल्यास ते 1 गुणांसाठी पुरेसे असतात. प्रत्येक पेपरचा कालावधी हा साधारणपणे 3 तासांचा असतो.  

1)    निबंध - 3 तास  

2)   सा. अध्ययन पेपर-1 --- 3 तास 

3)     सा. अध्ययन पेपर-2 ---  3 तास 

4)     सा. अध्ययन पेपर-3 ---3 तास 

5)     सा. अध्ययन पेपर-4 --- 3 तास 

6)     वैकल्पिक विषय पेपर-1 --- 3 तास 

7)     वैकल्पिक विषय पेपर-2 --- 3 तास 


           2013 च्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3 मध्ये प्रत्येकी 25 प्रश्‍न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर 200 शब्दात लिहावयाचे होते आणि प्रत्येक प्रश्‍नास 10 गुण होते. काही प्रश्‍नांमध्ये प्रत्येकी 5 मार्काचे उपप्रश्‍न विचारण्यात आले होते. मात्र 2014 च्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये 25 प्रश्‍न विचारले गेले असले तरी सामान्य अध्ययन पेपर 2 आणि 3 मध्ये मात्र प्रत्येकी 20 प्रश्‍न विचारण्यात आले होते. या 20 पैकी प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर 200 शब्दात 12.50 गुणांसाठी लिहिण्यास सांगितले होते. 2013 आणि 2014 या दोन्ही परीक्षांमध्ये सामान्य अध्ययन पेपर 4 मध्ये प्रत्येकी 14 प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यापैकी 6 प्रश्‍न केस स्टडीजवर विचारले होते. 5 केस स्टडीजना प्रत्येकी 20 गुण होते, तर एका केस स्टडीजला 25 गुण होते. या सर्वांची उत्तरे 250 ते 300 शब्दात लिहिणे अपेक्षित होते. उर्वरित 8 प्रश्‍न हे 125 गुणांसाठी विचारण्यात आले होते. त्यातही उपप्रश्‍न होते. 10 गुणांच्या प्रश्‍नांचे उत्तर फक्त 150 शब्दांत लिहिण्यास सांगितले होते. 
 निबंध पेपरमध्ये दोन घटकावर प्रत्येकी 1250 शब्दात दोन निबंध 3 तासांमध्ये लिहावयाचे होते. एकूण 26 वैकल्पिक विषयापैकी प्रत्येक वैकल्पिक विषयाचे 2 पेपर होते. प्रत्येक पेपरमध्ये दोन भागात प्रत्येकी 4 याप्रमाणे एकूण 8 प्रश्‍न होते. त्यापैकी प्रश्‍न 1 आणि प्रश्‍न 5 यामध्ये प्रत्येकी 5 उपप्रश्‍न होते. तसेच उर्वरित प्रश्‍नांमध्ये प्रत्येकी 2 ते 3 उपप्रश्‍न विचारण्यात आले होते. येथेही 10 गुणांच्या प्रश्‍नाचे उत्तर 150 शब्दात लिहिणे अपेक्षित असते. 

UPSC मुख्य परीक्षेची तयारी 
          2013 पासून मुख्य परीक्षा ही सुधारीत स्वरूपात होत आहे. उमेदवारांनी 50 टक्केपर्यंत गुण मिळविण्याचे लक्ष्य ठेवल्यास त्यांना देशात पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण होणे अवघड जाणार नाही. सुधारित मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची असून मुलाखतीचे 275 गुण धरून अंतिम निकालासाठी 2025 गुण विचारात घेतले जातात. यापैकी 1000 पेक्षा जास्त गुण मिळविल्यास तो उमेदवार निश्‍चितच देशात सर्वोच्च क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकतो.  
        पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नेहमी डोळ्यासमोर ठेवावा आणि  प्रयत्न करावेत. त्यामुळे अभ्यास जास्त सविस्तर आणि परिपूर्ण होण्यास मदत होते. शिवाय मुख्य परीक्षेच्या वेळेस अभ्यासाचे दडपण कमी होते.