शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

टाईप करीत असलेला शब्द कॉम्प्युटरला बोलायला लावा.



येथे विंडोज चे लहान आकर्षक वैशिष्ट्य आपण बघणार आहोत, ज्यात आपण आपल्या कॉम्प्युटरला आपण जे शब्द टाईप करु ते तो बोलेल. या ट्रिक मध्ये आपण एक स्क्रिप्ट तयार करणार आहोत, जी कॉम्प्युटरला आपण टाईप करीत असलेले शब्द बोलायला लावेल.

पुढील कार्यपध्दती अनुसरा :

1. एक नविन नोटपॅडची फाईल ओपन करा आणि खाली दिलेला कोड टाइप करा.
       Dim Message, Speak
       Message=InputBox("Enter Your Text","Speak")
       Set Speak=CreateObject("sapi.spvoice")
       Speak.Speak Message

2. या नोटपॅट फाईलला Speak.vbs या नावाने सेव्ह करा.

3. नंतर हि फाईल डबल क्लिक करुन रन करा.

4. येथे एक विंडो आपन होईल. यात आपल्याला हवी ती अक्षरे टाईप करुन Ok या बटनाला क्लिक करा.

5. आता तुम्ही टाईप केलेली शब्दे कॉम्पयुटरला बोलतांना ऐकू शकाल.

              Windows Compatibility: हि VBS फाईल विंडोजच्या Windows XP, Windows Vista, Windows 7 and Windows 8 या सर्व आवृत्यांवर चालते.