शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

पाण्यात पडलेला मोबाईल वाळवण्याच्या पाच टिप्स




अनेकदा मोबाईल फोन पाण्यात पडल्यावर खराब होतो. त्यामुळे बरेच जण आपापल्या पद्धतीने फोन कोरडा करण्याच्या पद्धती अवलंबतात. काही जण फोन ओव्हनमध्ये वाळवतात तर काही हीटरवर फोन ठेवतात. पण या पद्धतीने तुमचा फोन खराब होऊ शकतो.
जर तुमचा फोन पावसात भिजला असेल किंवा पाण्यात पडला तर काळजी करु नका. भिजलेला मोबाईल फोन वाळवण्याच्या पाच सोप्या टिप्स देत आहोत, जेणेकरुन तुमचा फोन खराब होणार नाही.

1. जर मोबाईल फोन भिजला असेल तर तातडीने त्याची बॅटरी काढून फोन स्विच ऑफ करा. फोन ऑफ केल्यानंतर सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.

2. फोनच्या अक्ससरीज वेगळं केल्यानंतर फोनचे इतर पार्ट्स वाळवणं गरजेचं आहे. यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. याशिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो.

3. भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांड सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवसा ठेवावा.

4. तांदळाच्या भांड्यात मोबाईल ठेवायचा नसेल तर सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता. हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

5. मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.

हे करणं टाळा:
ओला मोबाईल कधीही हेअर ड्रायरने वाळवू नये. ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.

Joshi.m.b
ता.शेवगाव जि.अहमदनगर