शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

मुलांच्या करीयरची दिशा ठरवताना…


प्रत्येक मूल वेगळं आणि अद्वितीय असतं. जसं फुलणारं प्रत्येक फूल वेगळं असतं नं तसं.
काही फुलांजवळ सौंदर्य असतं तर सुगंध नसतो….
काही फुलांजवळ सुगंध असतो तर सौंदर्य नसतं….
काही फुलांजवळ सौंदर्यही असतं आणि सुगंधही असतो….
तर काही फुलांजवळ सौंदर्यही नसतं आणि सुगंधही नसतो….
कोणत्या झाडावर फुलायचं हे स्वातंत्र्य फुलांना नसतं…
पण ते कळीच्या स्वरूपात असताना त्याला कोणतं खतपाणी घातलं पाहिजे हे जर समजून घेतलं तरच ते चांगलं फुलेल.

आपली मुलंही अशीच असतात. आणि म्हणूनच एका घरात जन्माला आलेली दोन भावंडं एकसारखी नसतात, इतकंच कशाला… जुळी भावंडं सुद्धा १०० टक्के एकसारखी नसतात. एखाद वेळी ती दिसायला एकसारखी असतील पण त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात.
कोणत्या घरात जन्माला यायचं हे स्वातंत्र्य मुलांना नसतं.
पण ते जन्माला येताना नेमकी कोणती गुणवैशिष्ट्ये घेऊन आलं आहे हे जर पालकांनी समजून घेतलं तर मूल नैसर्गिकरित्या त्याच्या कलानं फुलेल, घडेल.
त्यामुळं आपलं मूल कोणत्याही वयोगटाचं असू द्या, जोपर्यंत ते आपल्यावर अवलंबून आहे  तोपर्यंतच्या कोणत्याही टप्प्यात मुलाची जन्मजात गुणवैशिष्ट्ये जाणून घेऊन त्यानुसार प्रोत्साहन देणं म्हणजे खऱ्या अर्थानं  पालकत्वाची जबाबदारी पार पाडणं.

केवळ चांगल्या शाळेत घातलं, चांगल्या ट्यूशन मास्तरला जोडून दिलं, मागेल ते खाऊ-पिऊ घातलं म्हणजे पालकत्वाची जबाबदारी संपली असं खूपशा पालकांना वाटतं आणि मग ते पालक तुलनेच्या दोरावर झोके घेणाऱ्या अपेक्षांच्या  हिंदोळ्यांवर झुलत राहतात…
"शेवंतीचं फूल गुलाबाच्या फुलासारखं का दिसत नाही?" याची चिंता करत राहतात…
"बकुळीच्या फुलाला पारिजातकाचा वास का येत नाही" म्हणून दु:खी होतात…

आणि याचा परिणाम….?
घराघरातले हे संवाद…
"त्याला स्कॉलरशिप मिळाली तशी तुलाही मिळाली पाहिजे."
"तिला अमुक टक्के मार्क्स मिळाले तसे तुलाही मिळाले पाहिजेत."
"तो बघ कसा स्मार्ट दिसतो आणि तू बघ किती बावळट"
"तो बघ तबला वाजवतो, गातो…. तुला काहीही येत नाही."
"तिला बघ एकदा सांगितले की समजते. तू मंद आहेस अगदी."
"तो बघ टेनिस खेळायला जातो आणि तू? दिवसरात्र टी व्ही समोर बसलेला असतोस. काय उपयोग आहे त्याचा?"  
 "तो बघ कसा एका जागी बसून शांतपणे अभ्यास करतो, तुझ्या पायाला जणू भिंगरीच लागलीय. अरे मूर्खा, एका जाग्यावर शांतपणे बस आणि अभ्यास कर ना."
"अरे चेंगट मुला… लिही नं भरभर. इतकं स्लो लिहित बसलास तर पेपर कसा लिहून पूर्ण होणार तुझा?"
"सारखं काय रे अंगाशी अंगाशी? जा जरा बस जा तिकडं लांब जाऊन."
"अरे केव्हापासून ती सी डी काय ऐकत बसला आहेस? चल, अभ्यासाचं पुस्तक वाचायला घे."
"अरे बाबा, जरा शांत बसायला काय घेशील? एक तर एका जागी बसत नाहीस आणि बसलास की लगेच तुझं टेबल वाजवणं सुरु होतं. डोकं उठतं आमचं तुझ्या या वाजवण्यानं."    
"अरे किती प्रश्न विचारशील? आता काय सांगत्येय ते निमूटपणे ऐक. बस झाले तुझे प्रश्न."
"किती खाशील? अशी कशी सारखी सारखी भूक लागते तुला?
"आता ते हातातलं बाजूला ठेव आणि आधी खाउन घे, तुला भूक कशी नाही लागत?"
"इतकं लवकर दमायला काय झालंय तुला ? ते बघ बाकीचे अजून किती उत्साहानं खेळताहेत."
"अरे मूर्खा, तुला म्हणून दिलं तर तू सगळ्यांना वाटत काय सुटतोस? तो देतो का कधी कोणती गोष्ट तुला? मग तुला का त्याचा एवढा पुळका?"

मुलांच्या वर्तनाविषयी जेव्हा पालकांचा तक्रारीचा सूर असतो तेव्हा "मुलांचे वर्तन हे मुलांच्या जन्मजात स्वभाववैशिष्ट्यांचे  प्रतिबिंब असते" हे पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि मुलांच्या जन्मजात स्वभाववैशिष्ट्यांचे आकलन जर पालकांना झाले तर पालकांची चिडचिड कमी होते. त्यानंतरच पालक या नात्याने मुलांकडून अपेक्षित असलेल्या वर्तन सवयी जाणीवपूर्वक मुलांच्या अंगी बाणवता येतात आणि मुलांना योग्य दिशा देता येते.… त्यांना कुठेही न दुखवता आणि आपण डिस्टर्ब न होता !

काय असतात ही जन्मजात स्वभाववैशिष्ट्य?
त्याचं प्रतिबिंब मुलांच्या वर्तनातून कसं डोकावतं?
आणि मग त्यासाठी पालकांनी केव्हा काय केलं पाहिजे?
यावर काही खात्रीशिर उपाय आहे का?हो नक्कीच आहे......वैज्ञानिकदृष्ट्या जगात प्रमाणीत झालेला.
प्रत्येक मूल जन्माला येतानाच काही गुणवैशिष्ट्ये घेऊन आलेले असते. संगोपन होत असताना ती जन्मजात गुणवैशिष्ट्ये आपोआपच त्याच्या सवयी बनत जातात. पालक आपल्या मुलांना काही ना काही सवयी लावण्याच्या मागे असतातच. आता ज्या सवयी मुलांना लावण्यात पालक आग्रही असतात त्या सवयीं आणि जन्माला येताना त्या मुलाने सोबत आणलेली गुणवैशिष्ट्ये यांच्यामधे साधर्म्य असेल तर लहानपणापासूनच मुलं पालकांचं ऐकतात. पण साधर्म्य नसेल तर मुलं पालक त्यांना ज्या सवयी लावू इच्छितात त्या प्रकाराला आपल्या वर्तनातून विरोध करतात.
थोडं सविस्तरपणे समजून घ्या.

मुलांच्या जन्मजात आकलनशक्तीचे ढोबळ मानाने तीन प्रकार आहेत.
१) श्राव्यज्ञान Audio  (या प्रकारातील मूल Auditory Learner असते. हे मूल 'ऐकणे' या माध्यमाविषयी संवेदनशील असते.  या मुलात ऐकलेले लक्षात राहणे, आवाजावरून वाहन ओळखणे, आवाजावरून काय झालंय ते सांगण्याची क्षमता असणे, गाणी आपोआप पाठ होणे इ. गुणधर्म असतात.)
२) दृश्यज्ञान Visual (या प्रकारातील मूल Visual Learner असते. हे मूल 'पाहणे' या माध्यमाविषयी संवेदनशील असते.  या मुलामध्ये पाहिलेले लक्षात राहणे, चित्र स्वरूपातील किंवा प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टी लक्षात राहणे, इ. गुणधर्म असतात.)
३) स्पर्शज्ञान Tactile (या प्रकारातील मूल Kinesthetic Learner असते. हे मूल 'स्पर्श' आणि 'प्रत्यक्ष कृती' या माध्यमाविषयी संवेदनशील असते.  या मुलामध्ये प्रत्यक्ष जे करेल ते लक्षात राहणे, सतत उत्साही असणे, सतत कृतीशील राहण्यासाठी भरपूर उर्जा असणे इ. गुणधर्म असतात.)

हे तिनही प्रकार व्यवस्थित समजून घेण्यासाठी एक उदाहरण…
समजा मुलाला "पृथ्वी गोल आहे, ती स्वत:भोवती प्रदक्षिणा घालत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते" हा विषय समजावून सांगायचा आहे. अशा वेळी कोणाच्या बाबतीत काय घडते…

मूल जर Auditory Learner असेल तर त्याला नुसतं वाचायला सांगितलं तर अनेक वेळा वाचूनही त्याच्या लक्षात रहात नाही, पण दुसऱ्या कुणी वाचलेलं फक्त एकदा कानावर पडलं तरी त्याच्या सहज लक्षात राहतं. शाळेत बहुतेक वेळा मुलांनी फक्त ऐकायचेच असते त्यामुळे या प्रकारातली मुलं शिक्षकांच्या दृष्टीकोनातून 'हुशार' या सदरात मोडतात.

मूल जर Visual Learner असेल तर त्याला पृथ्वी, सूर्य, भ्रमण इ. ची चित्रे अंतर्भूत असलेला चार्ट दाखवत किंवा Animated video दाखवत समजावलं तर त्याच्या लक्षात राहते. त्यामुळे ज्या शाळांमध्ये चार्ट्स असत नाहीत, व्हिडिओज दाखवण्याची सोय असत नाही त्या शाळेतील शिक्षकांच्या दृष्टीने अशी मुलं 'अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारी' या सदरात मोडतात.

मूल जर Kinesthetic Learner असेल तर त्याला केवळ ऐकलेलं किंवा पाहिलेलं लक्षात रहात नाही. त्यासाठी त्याला समोर बोलावून, मध्यभागी दुसऱ्या मुलाला सूर्य म्हणून उभे करून त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालायला सांगितली तर त्याच्या पक्कं लक्षात राहतं. इतका वेळ शाळेत देता येत नाही म्हणून अशी मुलं शिक्षकांच्या दृष्टीने 'ढ' किंवा 'मंद' या सदरात मोडतात.

खरं तर प्रत्येक मूल हुशार असतंच, पण त्यांची शिक्षण घेण्याविषयीची संवेदनशीलता वेगवेगळी असते. शाळेत या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार शिकवण्यासाठी आताच्या शिक्षणप्रणालीत वेळ देता येत नाही, म्हणून आपल्या मुलांच्या संवेदनशीलतेला पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा "हल्लीची मुलं फारच विचित्र वागतात" ही तक्रार पालक सदैव करत राहतात.

"मुलांची learning style कळली की सगळं झालं" असं अजिबात नाही. तर त्यांची Thinking Style समजून घेणं हे ही गरजेचं आहे. त्यानंतर त्या दोन्ही stylesची सांगड घालत त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं, कोणत्या प्रकारचं मूल भविष्यात कोणत्या प्रकारची activity प्रभावीपणे करू शकतं या विषयीचे शास्त्रीय विश्लेषण आणि समुपदेशन "तरंग कौन्सलिंग सेंटर"द्वारा करण्यात येत .

Inborn Learning Style… ज्याला जन्मजात आकलन क्षमता म्हणता येईल ही ढोबळ मानाने तीन प्रकारची असते हे मी या आधीच्या भागात सांगितले होते. मुलं जन्माला येताना १००% आईवडिलांचेच गुण घेऊन जन्माला येतात असं नाही. पण आईवडील मात्र मुलांनी आपल्यासारखंच असावं ही अपेक्षा सतत करत असतात… आपल्या आयुष्याची आणि त्यांच्या आयुष्याची सतत तुलना करत राहतात, "आमच्या वेळी काही सुविधा नसताना आम्ही कसं शिकलो आणि तुम्हाला सगळं मिळत असतानाही तुम्ही शिकण्यात इंटरेस्ट घेत नाही" हे मुलांना नेहमी ऐकवत असतात. जरा इकडेतिकडे काही झालं की लगेच  "आईवर गेलाय" किंवा "बापावर गेलाय" म्हणून मोकळे होतात.… पण त्याने "आपलं मूल असंच का आहे?" याचं उत्तर तर मिळत नाहीच, उलट मुलांचं जसजसं वय वाढत जाईल तसतसं पालक-मुलांमध्ये भावनिक अंतर वाढत जातं . पुढे पुढे पालक "गेल्या जन्मी काय पाप केलं होतं कुणास ठाऊक की हा/ही आमच्या पोटी जन्माला आलाय/आलीय" असं मुलांच्या तोंडावर म्हणत मुलांना आयुष्यभर दोष देत राहतात आणि ते ऐकून मुलंही "तुम्ही नाही, मी गेल्या जन्मी काय पाप केलं होतं कुणास ठाऊक की तुमच्या पोटी जन्माला आलोय/आलेय" असं म्हणत पालकांना आयुष्यभर दोष देत राहतात. थोडक्यात सांगायचं झालं तर मुलं आणि पालक एकमेकांना खऱ्या अर्थानं ओळखत नाहीत .                                                             "  तरंग कौन्सलिंग सेंटर "                  मध्ये आम्ही मुलांच्या आकलन क्षमता, वैचारिक आणि मानसिक क्षमता यांच्या माहितीचे मुद्दे कळण्यासाठी "डरमायटोग्लायफिक्स" हे तंत्रज्ञान वापरतो.

आम्ही कसलीही टेस्ट घेत नाही…. कोणतेही प्रश्न विचारत नाही… कारण पारंपारिक पद्धतीच्या Aptitude Tests, Personality Tests मुलांना द्यायला आवडत नाहीत. पालक सांगतात म्हणून किंवा खूपदा त्याची सक्तीही करतात म्हणून मुलं विविध टेस्ट्स देतात… त्यावेळी त्यांची मानसिकता कशी आहे त्यावर मुलं कुठं टिक करणार किंवा काय लिहिणार किंवा कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय देणार ते अवलंबून असतं. त्यामुळे अर्थातच त्या टेस्ट्सच्या रिझल्टवर मुलांच्या आयुष्याची दिशा ठरवता येत नाही.

एकच टेस्ट वेगवेगळ्या वयात घेतली गेली तर त्याचे रिझल्ट्स बदलतात. याचाच अर्थ तथाकथिक Aptitude Tests चा काहीही उपयोग नाही कारण प्रत्येक वेळी इन्पुट बदलतो. त्यामुळे साहजिकच आउट्पुट संभ्रमावस्थेत नेणारा असतो. खूपदा दिशाभूल करणाराही !

आम्ही फक्त दोन्हीही हाताच्या बोटांचे ठसे घेतो… बस…! प्रत्येक माणसाच्या हातावरील बोटांचे ठसे वेगवेगळे असतात. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत बोटांच्या ठशात कधीही बदल होत नाही. इनपुट ज्येन्युइन असला तर आउट्पुट परफ़ेक्टच येणार. त्या ठशांवरून एक 3९ पानांचा डिटेल्ड रिपोर्ट जनरेट होतो. रिपोर्ट जनरेट झाला म्हणजे फक्त २० टक्के काम झालं. त्यानंतरचे कौन्सेलिंग हा सर्वात महत्वाचा ८०% भाग असतो. हा रिपोर्ट फक्त हे तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या कौन्सेलर्सनाच समजतो आणि तेच त्यावर योग्य कौन्सेलिंग देऊ शकतात.

आम्ही जेव्हा मुलांची Inborn Learning Style, Thinking Style, Intelligence Quotient, Emotional Quotient, Creative Quotient, Adversary Quotient… त्याचे त्यांच्या वागण्यातून दिसणारे पडसाद आणि त्या अनुषंगाने पालकांनी त्यांच्याशी कसे वागावे, कसे वागू नये याविषयीचे सविस्तर कौन्सेलिंग  दिले जाते तेव्हा आणि तेव्हाच पालकांना खऱ्या अर्थानं स्वत:चं मूल काय आहे ते समजतं. अन्यथा संपूर्ण संगोपन केले तरी ती मुलाशी/मुलीशी झालेली फक्त तोंडओळखच असते. हे ऐकायला, वाचायला विचित्र वाटले तरी ते सत्य आहे.

मग "आता चाललंय तसं चालू द्या, काय व्हायचं ते होऊ द्या…." म्हणत आंधळेपणानं मुलांच्या करियरवर पैसा लावत बसणं चांगलं की "एकदाच गुंतवणूक करून आपलं मूल काय आहे, त्याच्या क्षमता काय आहेत, त्याला / तिला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण प्रोत्साहन कसे द्यायला हवे हे जाणकार  कौन्सेलर्सकडून जाणून घेणं चांगलं" हे पालकांनीच ठरवायला हवं. नाही का?