शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आधुनिक जीवन



    Out dated झालंय आयुष्य,
    स्वप्नही download होत नाही,
    संवेदनांना virus लागलाय,
    दु:खं send करता येत नाही.

    जुने पावसाळे उडून गेलेत,
    Delete झालेल्या file सारखे,
    अन घर आता शांत असतं,
    Range नसलेल्या mobile सारखे.

    Hang झालेय PC सारखी,
    मातीची स्थिती वाईट,
    जाती माती जोडणारी,
    कुठेच नाही website.

    एकविसाव्या शतकातली,
    पीढी भलतीच cute,
    contact list वाढत गेली,
    संवाद झाले mute.

    Computer च्या chip सारखा,
    माणूस मनानं खुजा झालाय,
    अन mother नावाचा board,
    त्याच्या आयुष्यातून वजा झालाय.

    Hard Disk Drive मध्ये,
    आता संस्कारांनाच जागा नाही,
    अन फाटली मनं सांधणारा,
    internet वर धागा नाही.

    विज्ञानाच्या गुलामगिरीत,
    केवढी मोठी चूक,
    रक्ताच्या नात्यांनाही.
    आता लागते WhatsApp आणि Facebook.…