शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सांगा सांगा उत्तर सांगा.



साहित्य :-- साध्या सोप्या प्रश्नांचा संच .

कृती :- १.पाच पाच विद्यार्थ्यांचे दोन गट
         करावेत गटांना समोरासमोर बसवावे.
        २.दोन्ही गटांपैकी जास्त उत्तरे बरोबर
          येणारा गट विजयी होईल.

प्रश्न संच :                                                     
१)आपल्या देशाचे नाव काय आहे ?
२) आपल्या गावाचे नाव काय आहे ?
३) आपल्या तालुक्याचे नाव काय आहे ?
४) पाण्याचा उपयोग कशा -कशासाठी होतो ?
५) जेवणापूर्वी हात का धुवावेत ?
६) कोणकोणते पदार्थ कच्चे खातात ?
७) कोणकोणते पदार्थ शिजवून खातात ?
८) कोणकोणते पदार्थ भाजून खातात ?
९) कोणकोणते पदार्थ उकडून खातात ?
१०) कोणकोणते पदार्थ तळून खातात  ?
११) डोळ्यांचा उपयोग कशासाठी होतो ?
१२) कानाचा उपयोग कशासाठी होतो ?
१३) हाताचा उपयोग कशासाठी होतो  ?
१४) पायांचा उपयोग कशासाठी होतो  ?
१५) चार आणि दोन मिळून किती होतात  ?
१६)पाच मधून दोन काढल्यास किती उरतात ?
१७) काल कोणता वार होता ?
१८) उद्या कोणता वार आहे  ?
१९) शनिवार नंतर कोणता वार येतो  ?
२०) चिमणी कोठे राहते  ?
२१) गाय, बैल कोठे बांधतात  ?
२२) उंदीर कोठे राहतो  ?
२३) सिंह कोठे राहतो  ?
२४) मातीच्या वस्तू कोण बनवतो  ?
२५) दागिने कोण तयार करतो  ?
२६) कपडे कोण शिवतो ?
२७) आज कोणता वार आहे  ?
२८) आज किती तारीख आहे  ?
२९) आता कोणता इंग्रजी महिना सुरू आहे ?
३०) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो  ?
३१) सूर्य कोणत्या दिशेस मावळतो  ?
३२) घड्याळाचा उपयोग कशासाठी होतो ?
३३) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?
३४) पोपटाचा रंग कोणता  ?
३५) पोपटाच्या चोचीचा रंग कोणता  ?
३६) शिंगे असणारे पाच प्राणी सांगा ?
३७) खेळांची पाच नावे सांगा  ?
३८) दूध देणार्‍या प्राण्यांची नावे सांगा  ?
३९) गोड पदार्थांची नावे सांगा  ?
४०) आपले राष्ट्रगीत कोणते  ?
४१) आपला राष्ट्रीय प्राणी कोणता  ?
४२) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता  ?
४३) आपले राष्ट्रीय फूल कोणते  ?
४४) आठवड्याचे वार किती  ?
४५) मुख्य दिशा किती  ?
४६) उपदिशा किती  ?
४७) ज्ञानेंदियांची नावे  सांगा  ?
४८) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात  ?
४९) सरड्याला किती पाय असतात  ?
५०) पाय नसलेल्या प्राण्यांची नावे सांगा ?

   संकलक :- शंकर चौरे (प्रा. शिक्षक)
                   जि.प. प्रा. शाळा बांडीकुहेर
                  ता.साक्री जि.धुळे
              📞 ९४२२७३६७७५