शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

भीम अॅप


          भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या ॲपला भीम हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे ॲप ॲन्ड्रॉइड व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे ॲप १ कोटी ४० लाख वेळा मोबाईलवर डाऊनलोड करण्यात आले आहे. हे ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर आधारित आहे.

सभासद
भारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या ॲप्लिकेशनच्या सभासद आहेत. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण ४४ बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजीटल देवाण घेवाण करू शकतो.

बँक सूची
१. अलाहाबाद बँक २. आंध्र बँक ३. ॲक्सिस बँक ४. बँक ऑफ बडोदा ५. बँक ऑफ इंडिया ६. बँक ऑफ महाराष्ट्र ७. कॅनरा बँक ८. कॅथॉलिक सिरीयन बँक ९. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया १०. सिटी युनियन बँक ११. कॉर्पोरेशन बँक १२. डीसीबी बँक १३. देना बँक १४. फेडरल बँक १५. एचडीएफसी बँक १६. एचएसबीसी बँक १७. आयसीआयसीआय बँक १८. आयडीबीआय बँक १९. आयडीएफसी बँक २०. इंडियन बँक २१. इंडियन ओव्हरसीज बँक २२. इंडसइंड बँक २३. कर्नाटक बँक २४. करुर वैस्या बँक २५. कोटक महिंद्र बँक २६. लक्ष्मी विलास बँक २७. ओरीयेन्टल बँक ऑफ कॉमर्स २८. पंजाब नॅशनल बँक २९. आरबीएल बँक ३०. साउथ इंडियन बँक ३१. स्टँडर्ड चार्टर्ड बँक ३२. स्टेट बँक ऑफ ३३. स्टेट बँक ऑफ ३४. स्टेट बँक ऑफ इंडिया ३५. स्टेट बँक ऑफ ३६. स्टेट बँक ऑफ ३७. स्टेट बँक ऑफ ३८. सिंडीकेट बँक ३९. टीजेएसबी बँक ४०. युको बँक ४१. युनियन बँक ऑफ इंडिया ४२. युनायटेड बँक ऑफ इंडिया ४३. विजया बँक ४४. येस बँक

पर्याय
या ॲपवरून पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करून आपण देवाण घेवाण करू शकतो.

पैसे पाठवण्यासाठी:
१. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड वापरून. किंवा
२. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. किंवा
३. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा व्हर्रच्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.

पैसे स्वीकारण्यासाठी:
१. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा व्हर्रच्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.
२. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून.
३. स्वतःचा क्यूआर कोड वापरून.

संकलन
रितेश निलेवार