शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

G-Mail चा कौशल्यपूर्वक वापर



अल्टीमेट गाइड जे तुमचे जीमेलचे कौशल् वाढवून तुम्हाला एक्सपर्ट बनवतील (लेख जुना आहे त्यामुळे नवीन अपडेट्स वेगळे असू शकतात)_
हे महत्वाचे नाही की तुम्हाला आवड आहे किंवा नाही, पण ईमेल हा प्रोफेशनल आणि वैयक्तीक कम्युनिकेशनचा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच जवळपास सर्व युझर्सना त्यांच्या इनबॉक्सकडे सतत लक्ष ठेवावे लागते. यात एका वेळी अनेक टास्क समाविष्ट असतात, जसे मेल्स चेक करणे, रिप्लाय करणे, मेल मध्ये सर्च करणे आणि जर एका पेक्षा जास्त अकाउंट असतील तर ते सुध्दा चेक करणे.
पण जर तुम्ही जीमेलचे युझर असाल, तर यात अनेक कुल फिचर्स आहेत जे तुमची प्रॉडक्टीव्हीटी वाढवतात. सध्या जीमेलचे 900 मीलीयन पेक्षा जास्त युझर्स आहेत आणि ही 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून एक सर्वात लोकप्रिय सेवा आहे.परंतु अनेक युझर हे जीमेलच्या अनेक वैशिष्ट्यांबददल अवगत नाहीत, जे त्यांच्या साठी खुप फायदेशीर ठरू शकतील. येथे काही टिप्स्आणि ट्रिक्स आहेत जे तुमचे जीमेलचा अनुभव वृद्धिंगत करतील आणि तुमचा जीमेल वापरण्याची पध्दत बदलून जाईल.

1) Let Gmail prioritize your inbox:
जर तुम्हाला दररोज खुप मेल्स येत असतील तर लवकरच तुमचा इनबॉक्स शेकडो मेल्सने भरून जाइल आणि मग यातील महत्वाचे मेल कोणते आणि कोणत्या मेलला रिप्लाय दयायचा आहे हे शोधणे खुप कठिण हाऊन जाईल.
मग अश्या वेळी Priority Inbox आपोआप महत्वाचे मेल्स ओळखण्यासाठी प्रयत्न करतो आणि इतरांपासून त्यांना वेगळे करतो. बाय डिफॉल्ट Priority Inbox हो तीन भागात विभागलेला असतो - “Important and unread,” “Starred,” आणि “Everything else.” जीमेल हुशारीने वारंवार वाचले जाणारे मेल्स निवडतो आणि त्यांना अग्रक्रम देतो. Priority Inbox हो इनबॉक्स स्टाइल मधील एक आहे आणि तुम्ही सहज या स्टाइल मध्ये स्विच करू शकता - Priority Inbox सेट करण्यासाठी -
वरच्या उजव्या बाजूला असलेल्या गियर आयकॉनला क्लिक करा.Setting सिलेक्ट करा.Priority Inbox  सिलेक्ट करा.Inbox type  सेक्शन मध्ये  ड्रॉप-डाऊन मेन्यू मधून Priority Inbox   सिलेक्ट करा.पेजच्या तळाशी असलेल्या Save Changes बटनाला क्लिक करा.

2) Set Default Reply All:
प्रत्येकजणांना असे मेल्य येतात ज्यात अनके कॉनटॅक्ट असतात आणि वारंवार या सर्वांना रिप्लाय करावा लागतो, मग अश्या वेळेस डिफॉल्ट Reply रिप्लाय ऑप्शनला Reply All मध्ये बदलवू शकता.
वरच्या उजव्या बाजूला असलेल्या गियर आयकॉनला क्लिक करा.Setting सिलेक्ट करा.General टॅब मधील Default reply behavior येथे Reply All सिलेक्ट करा.पेजच्या तळाशी असलेल्या Save Changes बटनाला क्लिक करा.

3) Sign in to multiple accounts at once:
जर तुमच्या कडे एकापेक्षा जास्त जीमल अकाउंटस् असतील तर तुम्ही एकाच ब्राउझर मध्ये (Chrome किंवा Firefox) multiple sign-in वापरून एका अकाउंट मधून दुस-या अकाउंट मध्ये पुन्हा पुन्हा साइन इन आणि साइन आउट करता जाऊ शकता.
Add your Google Accounts
जीमेल मध्ये साइन इन करा.पेजच्या वरील उजव्या बाजूच्या प्राफाइल फोटो किंवा इमेल अॅड्रेसवर क्लिक करा.ड्रॉप-डाऊन मेन्यू मधून Add account वर क्लिक करा.दुस-या अकाउंटचे युझरनेम आणि पासवर्ड दया आणि साइन इन करा.
Switch between accounts
पेजच्या वरील उजव्या बाजूच्या प्राफाइल फोटो किंवा इमेल अॅड्रेसवर क्लिक कराज्या अकाउंटमध्ये साइनइन करावयाचे आहे तो सिलेक्ट करा.

4) Check emails from other accounts using Gmail:
जर तुमच्या अनेक जीमेल अकाउंट असतील, तर तुम्ही हे सर्व एका जीमेल मध्ये चेक करू शकता. जीमेलचे Mail Fetcher फिचर पहिले तुमचे सर्व जुने मेल्स येथे इंपोर्ट करतो आणि नंतर नविन येणारे मेल्स तुम्ही येथे चेक करू शकता. येथे एकाच वेळी जीमेल किंवा अन्य जे POP3 ची सर्विस पुरवतात असे 5 अकाउंट अॅड करू कशता.
वरच्या उजव्या बाजूला असलेल्या गियर क्लिक करा.Settings सिलेक्ट करा.निवडा सेटिंग्ज.Accounts आणि Import tab सिलेक्ट करा.Check mail from other accounts (using POP3) सेक्शन मधील Add a POP3 mail account ला क्लिक करा.येथे इतर अकाउंटचा ईमेल अॅड्रेस आणि पासवर्ड दया आणि नंतर Next Step ला क्लिक करा.आता तुम्हाला येथे अजून काही पर्याय निवडायचे आहेत.

5) Import email and contacts:
जर तुम्हाला दुस-या ईमेल सर्विस प्रोव्हाडर कडून जीमेल मध्ये स्विच करायचे असेल तर तुम्ही सहजपणे दुस-या अकाउंट मधील मेल्स आणि कॉन्टॅक्ट जीमेल मध्ये इंपोर्ट करू शकता. नविन मेल्स हे या जीमेलच्या अकाउंट मध्ये 30 दिवसापर्यंत फॉरवर्ड होत राहतील, जेणे करून या नविन ईमेल अॅड्रेस बददल इतरांना माहिती होईल.
वरच्या उजव्या बाजूला असलेल्या गियर ऑयकॉनला क्लिक करा.Setting सिलेक्ट करा.वरील बाजूला असेलेले Accounts आणि Import tab ओपन करा.Import mail and contacts link ला क्लिक करा.येथे जुन्या मेलचे डिटेल्स दया.

6) Unsubscribe from Mailing Lists:
जर तुम्हाला खुप न्युजलेटर्स मिळत असतील आणि जर तुम्हाला यातून unsubscribe करायचे असेल तर या मेल्सच्या खालील बाजूला असेली unsubscribe ची एक छोटी लिंक शोधून त्यावर क्लिक करावे लागते जे खुप डोकेदूखीचे ठरते. परंतू जीमेलने हे काम खुप सोपे केलेले आहे. यासाठी मेल ओपन करा आणि वरील बाजूला असलेल्या पाठविणा-याच्या ईमेल अॅड्रेसच्या बाजूच्या unsubscribe बटनाला क्लिक करा.

7) Undo sending your mail:
जर चुकून एखादा मेल पाठवला गेला असेल तर लगेच या अॅक्शनला Undo करण्यासाठी Undo send हा ऑप्शन इनॅबल करून ठेवा.
वरच्या उजव्या बाजूला असलेल्या गियर आयकॉनवर क्लिक करा.Setting सिलेक्ट करा.Undo Send साठी खाली स्क्रोल करा आणि Enable वर क्लिक करा.रद्द करण्याचा कालावधी (किती वेळापर्यंत ईमेल unsend करता येईल) सेट करा.पेजच्या खालील बाजूच्या Save Changes बटनावर क्लिक करा.
टीप: जेव्हा तुम्ही एखादा मेल पाठवता तेव्हा तो डायरेक्ट सेंट होता काही वेळ sending मध्ये असतो आणि या वेळेतच तुम्ही Undo करू शकता.

8) Gmail Offline:
जर इंटरनेट बंद असतांना सुध्दा तुम्हाला मेल्स रिड करायचे असतील, मेलला रिप्लाय करायचा असेल किंवा मेल मध्ये काही सर्च करायचे असेल तर – Gmail Offline हा ऑप्शन वापरा. हे एक अॅप आहे जे तुम्ही इंटरनेटला कनेक्ट नसतांना सुध्दा मेल्स रिड करण्याची परवानगी देते. तुम्ही मेल कंपोज सुध्दा करू शकता आणि ऑनलाइन आल्यानंतर हे मेल सेंट होतील.
Get the Chrome appChrome वेब स्टोअर पेज वर जा - https://chrome.google.com/webstore/category/appsयेथे Gmail Offline सर्च करा.+ Add To Chrome  या बटनावर क्लिक करा.

9)  Last account activity:
Last account activity मेल मधील रिसेंट अॅक्टीव्हीटी बददल माहिती देते. Last account activity मध्ये कोणत्या वेळेस कोणत्या ब्राउझर मध्ये मेल अॅक्सेस केले गेले, पॉप क्लायंट, मोबाइल डिव्हाइस, थर्ड पार्टी अॅप्लीकेशन, मेल अॅक्सेस केलेले आयपी अॅड्रेस . समाविष्ट असतात.
पेजच्या तळाशी असलेल्या Last account activity समोरील Details बटनावर क्लिक करा.

10) Remote sign out:
जर तुम्ही पब्लीक कॉम्प्यूटर मधून साइन आऊट करण्याचे विसला असाल किंवा ज्या मोबाइल मध्ये हा जीमेल अॅड्रेस असेल तो हरवला असेल तर रिमोटली साइन आउट करता येते.
जीमेल मध्ये लॉग इन करा.पेजच्या तळाशी असलेल्या Last account activity समोरील Details बटनावर क्लिक करा.आता एक नविन विंडो ओपन होइल.येथे Sign out all other sessions या बटनावर क्लिक करा.

11) Essential Keyboard Shortcuts:
कीबोर्ड शॉर्टकट वापरून तुम्ही तुमचे कार्य अधिक जलद आणि सोपे करता येइल. पण हे कीबोर्ड शॉर्टकट वापरण्यापूर्वी सेटिंग्ज मध्ये कीबोर्ड शॉर्टकट इनॅबल करणे आवश्यक आहे:
वरील उजव्या कोपऱ्या वरील गीअर आयकॉनला क्लिक करा आणि सेटिंग्ज सिलेक्ट करा.Keyboard shortcuts सेक्शन मधील Keyboard shortcuts ऑन करा.पेजच्या तळाशी असलेले Save Changes बटनावर क्लिक करा.
Shortcut Key Definition
C - Compose
d -  Compose in a new tab
/ -  Search
k  - Move to newer conversation
` -  Go to next inbox section
~  - Go to previous inbox section
o orEnter  - Open
s  - Star a message or conversation
+ -  Mark as important
- -  Mark as unimportant
!  - Report spam
r -  Reply
a  - Reply all
f  - Forward
Esc  - Escape from input field
Ctrl + s
#  - Delete
z  - Undo

-      दिनेश म्हस्के