शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

विभागीय उपशिक्षणाधिकारी तयारी 2017



उपशिक्षणाधिकारी परीक्षेसाठी आयोगाने 400 गुणांचे 2 वस्तुनिष्ठ पेपर व मुलाखत 50 गुणांची ठेवली आहे.आयोगाने प्रथमच या  विभागीय परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम जाहीर केला आहे.
दोन्ही पेपरच्या अभ्यासक्रमात 37 शासनाशी, शिक्षण विभागाशी संबंधित कायदे, नियम यांचा समावेश करण्यात आला आहे.
कायदे समजून घेताना त्यातील प्रमुख कलमे, महत्वाच्या तरतुदी, नियामक संस्थेची रचना, अंमलबजावणी दिनांक,कायदा करण्याचे उद्देश समजून घेणे आवश्यक आहे.
पेपर 1 व 2 करिता कायद्याच्या पुस्तकांसाठी शासकीय पुस्तकांचा वापर करता येईल.कायद्यावरील अधिकाधिक प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.एका मोठा कागदावरती कलमे, तरतुदी, महत्वाच्या बाबी लिहून त्यांचे चिंतन, मनन आवश्यक आहे.
एका तासात 100 प्रश्न सोडविण्याचा सराव परीक्षेत अगोदर किमान 15 ते 20 दिवस अगोदर करावा.
परीक्षेस कमी अवधी आहे म्हणून घाई , गडबडीने न वाचता प्रत्येक बाब समजून , उमजून आत्मसात करावी.
परीक्षेसाठी भारंभार पुस्तके न वाचता थोडीच पुस्तके पुन्हा पुन्हा वाचावीत.

पेपर 1 संदर्भ पुस्तके
1.अनिवार्य मराठी-के सागर
२.मराठी व्याकरण-मो रा वाळिंबे
3.इंग्रजी व्याकरण- रेन अँड मार्टिन
4.गणित-वा ना दांडेकर,प्रमोद हुमने
बुद्धिमत्ता-अनिल अंकलगी, लोळे
5.चालू घडामोडी-विनायक घायाळ
6.सामान्य ज्ञान-के सागर
7.माहितीचा अधिकार-व्ही बी पाटील, यशदा पुस्तिका
8.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-डॉ शशिकांत अन्नदाते
9.विभागीय उपशिक्षणाधिकारी पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक-डॉ शशिकांत अन्नदाते(के सागर पब्लिकेशन्स,पुणे)


पेपर 2 संदर्भ पुस्तके
1.नागरी सेवा नियम व कायद्यासाठी शासनाची पुस्तके अभ्यासवीत
2.विभागाशी संबंधित विषयासाठी डॉ शशिकांत अन्नदाते यांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(तृतीय आवृत्ती)पुस्तक अभ्यासावे
3.शासनाच्या विविध योजनांसाठी शिक्षण विभागाच्या वेबसाइट पहाव्यात
4.विभागीय उपशिक्षणाधिकारी पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक-डॉ शशिकांत अन्नदाते(के सागर पब्लिकेशन्स'पुणे)