शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आधार पावती वरून मिळवा आधार कार्ड




शिक्षक मित्रांनो,
सध्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला विदयार्थ्यांचे आधार कार्ड नोंदवायचे आहेत.
पण बऱ्याच विदयार्थ्याकडे आधार कार्ड नाही किंवा त्यांना अजूनपर्यंत मिळाले नाही... पण त्यांच्याकडे पावती आहे.
ज्यांच्याकडे पावती आहे अशा विदयार्थ्यांचे आधार नंबर ऑनलाईन मिळवता येतात... !
ते कसे मिळवायचे..?
चला पाहुयात.. !
खालील स्टेप प्रमाणे कृती करा
💠 प्रथम www.uideai.gov.in या वेबसाईटवर जा.
💠 आधार स्टेटस या लिंकवर click करा.
💠 यानंतर e-aadhar यावर click केल्यावर आपल्यासमोर एक नवीन window open होईल.
💠 यामध्ये पावतीवरील क्रमांक, दिनांक व वेळ टाका. यात कुठलाही बदल करू नये. तंतोतत टाकावे.
उदा: 1234/56789/3445
18/08/2016 14: 21:17.
💠 विदयार्थ्याचे नाव पावती वर जसे आहे तसचे टाकावे.
💠 पावतीवर असलेला पिनकोड टाका.
💠 मोबाईल नंबर च्या ठिकाणी तुमचा किंवा माहीती भरणाऱ्याचा नंबर टाकावा.
(पालकांचा टाकू नये कारण या नंबरवर पासवर्ड येईल.)
💠 capchya code टाका व submit करा.
💠 आपण दिलेल्या मोबाइल नंबर वर वन टाईम पासवर्ड येईल.
💠 आलेला पासवर्ड लगेच खाली लिहीलेल्या पासवर्ड या विंडोत टाका व सबमीट करा.
💠 आता पुन्हा नवीन window open होईल यात सिक्युरिटी पासवर्ड ज्या जागी पावतीवरील पिनकोड टाका व OK बटनावर Click करा.
💠 PDF फाईल Download होईल Open करा. आता आपल्यासमोर विदयार्थ्याचे आधार कार्ड दिसेल
(संदर्भ whatsapp )